सोनालिका च्या देशातील विक्रीत नोव्हेंबर २०२० मध्ये भरघोस ७१ टक्के वाढ
पुणे – भारतातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॅक्टर निर्यातदार सोनालिका ट्रॅक्टर्स ने जगभरातील शेतकरी बांधवांनी कंपनीच्या तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत उत्पादनांवर दृढ भरोसा ठेवत २०२०-२१ आर्थिक वर्षात कंपनीच्या व्यवसायाची कमान दर महिन्यात चढती ठेवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या विश्वासाच्या आधारावरच कंपनीला नोव्हेंबर महिन्यात ११४७८ ट्रॅक्टर विकून ७१ टक्के एवढी घसघशीत व्यवसायवृद्धी नोंदवता आली आहे. याच महिन्यात ट्रॅक्टर उद्योगाची वृद्धी मात्र ४९ टक्के झाली आहे. सोनालिका ने यावर्षी आतापर्यंत (एप्रिल- नोव्हेंबर २०२०) देशात आणि परदेशांत मिळून ९२९१३ ट्रॅक्टर ची विक्री केली आहे.
या कामगिरीविषयी सोनालिका समूहाचे कार्यकारी संचालक रमण मित्तल म्हणाले, आम्ही सातत्याने ट्रॅक्टर उद्योगाच्या एकंदर कामगिरीपेक्षा बरीच चांगली कामगिरी नोंदवत आहोत. आमची कस्टमाइज्ड ट्रॅक्टर आणि अवजारे प्रगत वैशिष्ट्यांनी युक्त असल्यामुळे शेतक-यांच्या उत्पादकतेत मोठी भर पडते आणि त्यामुळेच आमच्या उत्पादनांना शेतक-यांची पहिली पसंती मिळते.
ते पुढे म्हणाले, दक्षिण भारतात शेतीची कामे जोरात चालू आहेत. या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या महाबली श्रेणीसह सज्ज आहोत. हा ट्रॅक्टर दक्षिण भारतातील पिकांचे आणि जमिनीचे स्वरूप आणि शेतक-यांच्या अपेक्षा यांचा अभ्यास करून डिझाईन केलेला आहे. ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादात व्यक्त झालेल्या अपेक्षा लक्षात घेऊनच खास दक्षिण भारतासाठी महाबली श्रेणी विकसित करण्यात आली आहे. यांच्या महा टॉर्क, महा स्पीड आणि महा कम्फर्ट या वैशिष्ट्यांमुळे शेतक-यांची उत्पादकता आणि म्हणूनच कमाईही वाढत आहे.
