fbpx
Saturday, April 27, 2024
MAHARASHTRATOP NEWS

विधानपरिषद निवडणूक – धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरीश पटेल विजयी

धुळे – विधान परिषदेच्या धुळे – नंदुरबार मतदारसंघात पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाचे अमरीश पटेल विजयी झाले आहे.

अमरीश पटेल यांना ३३२ मतं मिळाली. तर, काँग्रेसचे अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली. तसेच चार मतं अवैध ठरवण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मतमोजणी पार पडली.

धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी 99 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. काँग्रेसमधून भाजप आलेले अमरीश पटेल तसेच भाजपामधून कॉंग्रेसमध्ये आलेले अभिजीत पाटील यांच्यात मुख्य लढत होती.

यापैकी ३३२ मतं मिळवत पटेल यांनी बाजी मारली. धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपाचे संख्याबळ पाहता त्यांचे पारडे जड असल्याने भाजपाचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading