Saturday, May 30, 2026
PUNE

पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी :डॉ मयुरी पंड्या  

पुणे, दि. 2 – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए.के.के. न्यू लॉ अॅकॅडमीच्या वतीने आयोजित ‘ राईट टू पोल्यूशन फ्री एन्व्हायर्नमेंट -ज्युडीशियल ट्रेंडस् ‘ या विषयावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला.२ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हा वेबिनार झाला. युनायटेड नेशन्स असोसिएशन ( गुजरात ) च्या महासचिव डॉ. मयुरी पंडया,डॉ. विजय ओक,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार   यांनी  मार्गदर्शन केले.प्रदूषण नियंत्रण दिनाचे औचित्य  साधून हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता.  
डॉ.मयुरी पंड्या म्हणाल्या,’पर्यावरण विषयक कायदे तयार करणारा भारत हा पहिला देश आहे.अनेक कायदे अस्तित्वात असले तरी  पर्यावरणाच्या ढासळणाऱ्या संतुलनाबद्दल प्रशासन आणि व्यवस्थेला जबाबदार धरून चालणार नाही. नागरिक म्हणून आपण पर्यावरणाप्रती कर्तव्य पार पाडणेही तितकेच महत्वाचे आहे. आबेदा इनामदार म्हणाल्या,’पर्यावरण संवर्धनाची सुरुवात घरातून व्हायला हवी. प्रदूषणयुक्त शहरे हा चिंतेचा विषय होऊ लागला आहे’. प्राचार्य डॉ रशीद शेख म्हणाले,’शाश्वत विकासाची मार्गदर्शक तत्वे पाळली तर प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा हक्क मिळू शकेल’.
अध्यक्षस्थानी डॉ.पी. ए. इनामदार होते. प्रा. मुझफ्फर शेख , डॉ. रशीद शेख हे सहभागी झाले.  डॉ. सलीम शेख, डॉ.मोरेश्वर कोठावदे , डॉ. स्वाती शिंगटे यांनी संयोजन केले. अमीन शेख,रमीझ शेख,नाझीम शेख यांनी ऑनलाईन वेबिनार ची तांत्रिक बाजू सांभाळली.जेसिंटा बॅस्टीन यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. स्वाती शिंगटे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading