Saturday, May 30, 2026
PUNE

पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने १३० व्या ब्राह्मो परिषदेचे आयोजन

पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने १३० व्या ब्राह्मो परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन परिषद होणार असून पुणे प्रार्थना समाजाच्या १५० व्या वर्षानिमित्त परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ आणि ५ डिसेंबर रोजी पुण्यातून लाईव्ह परिषद होणार आहे, अशी माहिती पुणे प्रार्थना समाजाचे चिटणीस दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ब्राह्मो परिषदेचे अध्यक्ष ब्राह्मो समाज दिल्लीचे अध्यक्ष संजोय चंदा असणार आहेत. त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.डॉ. राजा दिक्षीत, फॉरेन्सिक मेडिसिन महाराष्ट्र राज्याच्या माजी अध्यक्षा डॉ. वसुधा आपटे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधनाचे भूपाल पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु  प्रा. डॉ. नितीन करमाळकर, सुधीर देवरे या परिषदेत सहभागी होणार आहेत.   
तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाजासोबत जोडणे, हा परिषदेचा मुख्य विषय असणार आहे. याच विषयावर परिषदेत विविध मान्यवर बोलणार आहेत. शुक्रवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सत्राला  सुरुवात होईल. https://puneprarthanasamaj.org/ या लिंकद्वारे परिषदेत सहभागी होता येणार आहे. 
दिलीप जोग म्हणाले, पुणे प्रार्थना समाजाने मानवतावादी, समानतावादी, आध्यात्मिक, सद्वर्तन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ही पंचसूत्री स्विकारली. या पंचसूत्रीच्या सहाय्याने ज्ञानाधिष्ठित आणि मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाजाशी कसे जोडता येईल, हा परिषदेचा मुख्य विषय आहे. 
पुण्यात यापूर्वी ४  ब्राह्मो परिषदा झाल्या आहेत. सन १९९१, २००४ आणि २०१२ मध्ये ३ री परिषद पुण्यात झाली, तर ४ थी परिषद यंदा होणार आहे. यामध्ये तरुणाईसोबत ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी होणार आहेत. परिषदेत दोन सेमिनार होणार आहेत. पहिल्या सेमिनारमध्ये तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाज सोबत जोडण्याचा आराखडा आणि  दुसºया सेमिनार मध्ये तरुणाईच्या ब्राह्मो आणि प्रार्थना समाजाकडून अपेक्षा या विषयावर विचार मंथन होणार आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading