Wednesday, June 17, 2026
PUNE

शेतकऱ्यांचा आवाज दाबू नका : हनुमंत पवार, युवक काँग्रेस प्रवक्ता

पुणे :बड्या भांडवलदारांचा फायदा करण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा मोदींचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. दिल्लीला शांततेच्या मार्गाने जमलेल्या शेतकर्यावर पोलीसी बळाचा वापर सुरू केला आहे याचा तिव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

आज पुण्यात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे.

“हुकुमशाही पद्धतीने लोकशाहिचा गळा दाबत सगळे संसदीय नियम धाब्यावर बसवत विरोधकांची मुस्कटदाबी करत शेतकर्यांना बड्या भांडवलदारांच्या दावणीला बांधणारे तीन कृषी विधेयके संसदेत मोदीनी मंजूर करून घेतली. शेतकरी, शेतकरी संघटना, विरोधी पक्षांना न जूमानता आणलेल्या कायदयांविरोधात संपूर्ण देशात आवाज बुलंद होत आहे. यामूळे घाबरलेल्या केंद्र सरकारने आता दिल्लीला शांततेच्या मार्गाने जमलेल्या शेतकर्यावर पोलीसी बळाचा वापर सुरू केला आहे याचा मी तीव्र निषेध करतो. काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी या आंदोलकांसोबत उभा आहे, ‘ असे युवक काँग्रेस प्रवक्ता हनुमंत पवार
यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading