Tuesday, June 23, 2026
ENTERTAINMENT

कोव्हिड फ्रंटलाइन फायटरच्या मुलीचे इंडियन आयडल २०२० मध्ये स्थान निश्चित

इंडियन आयडल हा नेहमीच एक तणाव दूर करणारा कार्यक्रम ठरला आहे. कारण संगीत हे प्रत्येकाला ताजेतवाने करणारे असते. हे लक्षात घेत, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने सध्याच्या कठीण काळात देशाचा मौसम बदलण्यासाठी इंडियन आयडलचा आणखी एक सीझन घेऊन पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. ऑडिशनदरम्यान सायली कांबळे हिने चमकदार कामगिरी केली. त्यासोबतच, तिचे वडील कोव्हिड रुग्णांसाठी कशा प्रकारे अँब्युलन्स चालवतात, याचीही कहाणी कथन केली.

सायलीचे वडील नेव्हीमध्ये आहेत, मात्र साथीच्या काळात त्यांनी कोव्हीड रुग्णांसाठी नेव्हीशी निगडीत रुग्णालयाकरिता अँब्युलन्स चालवायला सुरुवात केली. अगदी लहानपणापासून सायली संगीत शिकते. काहीही केले तरी पालकांसाठी अभिमानास्पद काम करायचे, असे तिचे स्वप्न आहे. तिची निवड झाली तेव्हा वडिलांना खूप अभिमान वाटला, याप्रसंगी त्यांनी  अँब्युलन्सवर माइक ठेवला.

 तिन्ही जजना तिचे सादरीकरण उत्कृष्ट वाटले. तीचे सूर स्पष्ट जाणवले. तिचा आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, “ इंडियन आयडलद्वारे माझ्या पालकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी मी करेन. ते माझी सपोर्ट सिस्टिम आहेत. त्यांनी प्रत्येक वेळी मला प्रोत्साहन दिले आहे. इंडियन आयडलकडून माझे स्वप्न साकार झाले, आता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे. ”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading