लोकजनशक्ती पार्टीचा २०वा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार
पुणे : रामविलास पासवान यांनी स्थापन केलेल्या लोकजनशक्ती पार्टीचा २०वा वर्धापनदिन पुण्यात २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे चार वाजता साजरा होणार आहे.यानिमित्त साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
रामविलास पासवान यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे. पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शमीम हवा कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असतील तर प्रदेश सचिव अशोक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यादवराव सोनावणे (अंकल ) हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
