Monday, June 22, 2026
PUNE

पुणे शहर वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधान सन्मान रॅलीचे आयोजन

पुणे – शहर वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये पुणे शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते.
सदर रॅलीची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली.तेथून पुढे महात्मा फुले वाडा या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रॅलीची सांगता पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली. सदर अभिवादन सभेमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत साळवे, प्रदेश प्रवक्ते संतोष संखद , महिला आघाडी राज्य सदस्य वंशिव ताई, पुणे जिल्हा अध्यक्ष सीमा ताई भालेसिंग,स्वीटी ताई कांबळे, शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी, कार्याध्यक्ष प्रफुल गुजर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष शुभम चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
सदर रॅलीमध्ये शहराचे उपाध्यक्ष विकास भेगडे, महासचिव जितेंद्र जाधव,महेश कांबळे, संघटक मनोज क्षीरसागर, सहसंघटक सतीश रणवरे,प्रवक्ते गौरव जाधव, प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड, सदस्य मयूर शिंदे, सोमनाथ पानगावे,ईश्वर लष्करे,सचिव विशाल कुदळे,कोषधाक्ष अभिजीत शेलार, हडपसर विधानसभा अध्यक्ष पितांबर धिवार, वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष विवेक लोंढे,पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष फयाज सय्यद, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष महेंद्र येरेल्लू, वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष अतुल नाडे, अक्षय बचुटे,अजय कोरपे,रणजीत केदारी, एड. किरण कदम, गौतम ललकारे, धनाजी खंकाळ, अनिल गायकवाड,संजू कांबळे, सुनील कांबळे,नारायण जाधव,आदी आजी माजी फुले,शाहू,आंबेडकर चळवळी मधील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कांबळे यांनी केले. आभार प्रवक्ते गौरव जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading