मुळव्याध्याविषयी लोकांमध्ये गैरसमज आमदार राहुल कुल यांचे मत
पुणे : मुळव्याध हा आजार ग्रामीण भागामध्ये जास्त आढळतो. परंतु याविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये असतात. प्रत्येकाला शहरी भागात जाऊन उपचार घेणे शक्य नसते. डॉ. कामठे पाईल्स आता ग्रामीण भागातही सेवा देत आहे. मुळव्याध आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करुन कोणतीही भिती न बाळगता उपचार घेऊन निरोगी जीवनाचा आनंद घ्यावा असे, मत आमदार अॅड. राहुल कुल यांनी व्यक्त केले.
डॉ. कामठे पाईल्स क्लिनीकच्या वतीने जागतिक मुळव्याध दिनाचे औचित्य साधून मोफत मुळव्याध शिबिराचे आयोजन उरळीकांचन येथे करण्यात आले होते. यावेळी उरळीकांचन येथे नव्याने सुरु झालेल्या डॉ. कामठे पाईल्स क्लिनीकचे उद्घाटन अॅड. राहुल कूल यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अशोक बापू पवार, रमेशअप्पा थोरात, महादेव कांचन, राजारामदादा कांचन, मुरलीधर भोसेकर, जालिंदर कामठे, अमित कांचन, संतोष कांचन, किर्तीताई कांचन, डॉ. योगिता रोहकले, डॉ. प्रविण रोहकले, विशाल शितोळे, डॉ. कामठे पाईल्स क्लिनीकचे प्रमुख डॉ. कुणाल कामठे, डॉ. शर्मिला कामठे यावेळी उपस्थित होेते.
डॉ. कुणाल कामठे म्हणाले, कोविडच्या काळात मागील काही महिन्यामध्ये आपल्या जीवनशैलीत खूप बदल झाला त्यामुळे मुळव्याध ग्रस्तांचे प्रमाण वाढले. मुळव्याध आजार सध्या खूप सर्वसामान्य झाला आहे. मुळव्याधाविषयी जनजागृती होऊन लोकांनी उपचार घ्यावेत या उद्देशाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. प्रदीप राजपूत, प्रदीप मोरे, राजेंद्र भोसेकर, डॉ. सीमा पाटोळे, चांदबी शेख आदींनी शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
