कासुरडीत यंदा पहिल्यांदा साजरी झाली दिवाळी
पुण्यातील गणेश मंडळांचा उपक्रम : वस्तीतील लोकांची दिवाळी झाली गोड
पुणे : भोर तालुक्यातील कासुरडी आणि किकवी येथील कातकरी नागरिकांनी यंदा पहिल्यांदा दिवाळी साजरी केली. पुण्यातील तीन गणेश मंडळाच्या पुढाकाराने कातकरी वस्तीमध्ये दीपोत्सव साजरा झाला.
बुधवार पेठतील बाल विकास मित्र मंडळ, भवानी पेठ मधील श्री शिवाजी मित्र मंडळ आणि कसबा पेठेतील विधायक मित्र मंडळ या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाशापासून वंचित असलेल्या या वस्तीतील नागरिकांना आकाशकंदील, पणत्या, फराळ देत दीपोत्सव साजरा केला.
या निमित्ताने वस्तीतील रहिवाशांनी यंदा पहिल्यांदा दिवाळीच्या सणाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाचे संयोजन पीयूष शाह यांनी केले. यावेळी उत्कर्ष खुणे पाटील, प्रल्हाद थोरात, आभिषेक मारणे, गोविंदा वरणदानी, संदीप शिंदे, हर्षल निगडे, शिवम देवकर, केदार जागडे , रवी जाधव उपस्थित होते.
