Friday, September 4, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्याची चिंता वाढली आज नव्या रुग्णसंख्येत ६ हजारांनी वाढ

पुणे जिल्ह्यात 24 तासात 1 हजराहुन अधिक पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. त्यातच आज कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आज राज्यात ६ हजार १५९ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ४ हजार ८४४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १६ लाख ६३ हजार ७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.६४ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ५ लाख २९ हजार ३४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८४ हजार ४६४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ६ हजार १५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. आज नोंदवण्यात आलेल्या ६५ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ९ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे शहर आकडेवारी

  • दिवसभरात 426 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 258 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 6 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    168030
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-5272
  • एकूण मृत्यू – 4446
  • एकूण डिस्चार्ज- 158312

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading