Monday, June 15, 2026
BusinessLIFESTYLE

ग्लेनमार्क फेविपिरविरच्या उपचाराने सौम्य ते मध्यम कोरोना ग्रस्त रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होतोय

मुंबई –  फेविपिरविर हे कोरोना रुग्णांनी तोंडावाटे घेण्याचे विषाणू च्या पुनर्निर्मितीला रोखणा-या औषधाच्या उपचाराने सौम्य ते मध्यम कोव्हिड -१९ ने ग्रस्त रुग्ण बरा  होण्याचा कालावधी कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ने केलेल्या तिस-या टप्प्याच्या रँडमाइज्ड चाचणीत ही निरीक्षणे नोंदली गेली असून इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फेक्शस डिसीजेस (आयजेआयडी) मध्ये प्रसिद्ध झाली आहेत.  आयजेआयडी   हे अमेरिकेतील इंटरनॅशनल सोसायटी फॉर इन्फेक्शस डिसीजेस या संस्थेतर्फे प्रकाशित होते. फेविपिरवीर ची परिणामकारकता आणि सुरक्षितता यावरचा हा लेख डॉ. झरीर उदवाडिया आणि इतर सांशोधकांनी संयुक्तपणे लिहिला आहे.  

फेविपिरवीर (उत्पादनाचे नाव फॅबिफ्ल्यू) ची तिस-या टप्प्याची चाचणी रँडमाइज्ड पद्धतीने देशभरातून निवडलेल्या १५० रुग्णांवर घेण्यात आली. कोरोना लागण झाल्याचे निदान  झाल्यापासून ४८ तासात  फेविपिरवीर ची परिणामकारकता आणि सुरक्षितता आणि  सर्वसाधारण शुश्रूषा मिळालेल्या आणि फक्त सर्वसाधारण शुश्रूषा मिळालेल्या सौम्य ते मध्यम कोरोना ग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीतील बदलाचे निरीक्षण नोंदणे हे या चाचणीचे उद्दिष्ट होते.  फेविपिरवीर चे उपचार मिळालेले रुग्ण बरे होण्याचा काळ कमी होता आणि त्यांना ऑक्सिजन देण्याची गरज कमी प्रमाणात लागणे असे इतरही फायदे झाल्याचे या चाचणीत दिसून आले. शिवाय, फेविपिरवीर चा उपचार केलेल्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा लवकर घरी पाठवण्यात आले. 

मुंबई च्या ब्रीचकँडीरुग्णालयाचे डॉ झरीरउदवाडियाएमडी , एफआरसीपी, एफसीसीपीम्हणाले,  कोव्हिड -१९ वरच्या कोणत्याही औषधाची परिणामकारकता रुग्णालयात घेतलेल्या चाचण्यांच्या निरीक्षणांवरून सिद्ध झाली पाहिजे.  त्यांनी  १५० रुग्णांवर  ती चाचणी सुनियोजित केली  होती आणि त्यातून असे दिसून आले की फेव्हिपिरविर मुळे संसर्ग लवकर नष्ट झाला आणि रुग्ण बरा होऊन घरी जाण्याचा काळ लक्षणीयरीत्या कमी झाला. 

कोव्हिड -१९ ही महामारी आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लुएचओ ) ने  जाहीर केल्यापासून या रोगाने जगातील लाखो लोकांना ग्रासले आहे. यापैकी बहुतांश लोकांचा आजार  सौम्य ते मध्यम स्वरूपाचा होता आणि ताप, खोकला, श्वसनात अडथळा अशी त्यांची सर्वसाधारण लक्षणे होती.  तीव्र आजार झालेल्या रुग्णांना न्युमोनिया, तीव्र श्वसनरोध, मूत्रपिंडे निकामी होणे आणि मृत्यू असे धोके संभवतात . 

कोरोनाची जगभरात प्रचंड प्रमाणात लागण होत असताना ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ने केलेली ही चाचणी म्हणजे कंपनी चा सर्व रुग्णांना परवडेल असे औषध उपलब्ध करून देऊन त्यांच्या जीवनमानाची पातळी सुधारण्याचा प्रयत्न होता याची पावती होती, असे ग्लेनमार्क च्या ग्लोबल स्पेशालिटी ब्रँड पोर्टफोलिओ च्या प्रमुख मोनिका टंडन म्हणाल्या.

यावर्षी (२०२०)च्या जून मध्ये ग्लेनमार्क ला फेविपिरवीर (फॅबिफ्ल्यू ) चे उत्पादन आणि मार्केटिंग करण्याची परवानगी भारतीय औषध नियंत्रकांकडून मिळाली. सौम्य ते मध्यम कोरोना ने ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी तोंडावाटे देण्याचे ते पहिले मान्यताप्राप्त औषध ठरले.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading