मजुरांना फराळ वाटप, मुलींच्या हस्ते मजुरांचे औक्षण
पुणे: साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने मजूर अड्डा बुधवार पेठ येथील मजुरांचे मुलींच्या हस्ते औक्षण करून फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी पियुष शाह, संकेत निंबाळकर, नंदू ओव्हाळ, मधुकर कदम, शिवम देवकर, ऋजुला देवकर, तन्वी ओव्हाळ , कैलाश गुंजाळ आदी उपस्थित होते.
मजुरांसारखे कष्टकरी बांधव साफसफाई, दुरुस्ती काम, सुतार काम अशी हातावर पोट असणारी कामे करतात. त्यांना दिवाळी, दसरा अशा सणांचा आनंद घेता येत नाही. दिवाळी पाडवा गोड जावा या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
मजूर बांधवाला दिवाळीसारख्या सणांची आतुरतेने वाटही पाहता येत नाही. तो आपल्या पोटापाण्याचा प्रथम विचार करतो. दिवसभर कष्ट करून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. अशा लोकांच्या जीवनात दिवाळी सण साजरा होणे. ही कौतुकास्पद बाब आहे.
