कोरोना – राज्यात सोमवारी 4 हजार 153 रुग्णांची वाढ
पुण्यात 206 नविन रुग्ण
मुंबई – राज्यात आज, सोमवारी 4 हजार 153 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 लाख 84 हजार 361 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 81 हजार 902 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 16 लाख 54 हजार 793 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज दिवसभरात 3 हजार 729 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
राज्याचा रिकव्हरी रेट 92.74 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 46 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर 2.61 टक्के एवढा आहे.
राज्यात आज 4153 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3729 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 16 लाख 54 हजार 793 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 81 हजार 902 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.74% झाले आहे.
पुणे शहर अपडेट्स
- दिवसभरात 206 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 181 रुग्णांना डिस्चार्ज.
- 9 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
167188 - ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-4917
- एकूण मृत्यू – 4435
- एकूण डिस्चार्ज- 157836
