एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल- पीसीएमसीच्या ग्राहकांची पहीली पसंत
एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल हे पुण्यातील पीसीएमसी मधील सर्वात रमनिय, फॅशन आणि खाद्यपदार्थ आदी सुविधांनी युक्त असे लोकांच्या पसंतीचे गंतव्य बनले आहे. पीसीएमसीच्या मध्यभागी असलेल्या बर्याचश्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रांड्ससह सुसज्ज अश्या या म़ॉल ने स्वत: ला एक लोकप्रिय मॉल म्हणून स्थापित केले आहे . असे बरेचसे ब्रॅण्ड्स आहेत ज्यांनी पीसीएमसीमध्ये प्रवेश करण्यासाठी एल्प्रोसिटी स्क्वेअरशी भागीदारी केली आहे.
अवघ्या एका वर्षात, एल्प्रो सिटी स्क्वेअरने पीसीएमसीच्या लोकांचे लक्ष वेधले आहे, आणि प्रेम मिळवले आहे. आणि ते सर्वांसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे. फूड कोर्ट, मल्टिप्लेक्स थिएटर आणि मोठ्या आऊट डोअर प्लाझा ने सुसज्ज असे हे ठिकाण मैफिली, सामुदायिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी देखील सुयोग्य ठिकाण आहे.
एल्प्रो सिटी स्क्वेअर च्या भव्य उद्घाटणाच्या अवघ्या काही महिन्यांत, मॉल ने “दि सिटी फेस्टिव्हल” सारख्या मोठ्या सामुदायिक कार्यक्रमांद्वारे कायमस्वरुपी छाप पाडली, ज्यात समय रैना, विपुल गोयल, फिडल्राफ्ट, मलंग आणि बरेचसे कलाकार व या व्यतिरिक्त बर्याच नामांकित सेलिब्रिटींनीही एल्प्रो सिटी स्केवरला भेट दिली आहे. मास्टर शेफ विकास खन्ना भेट आणि अभिवादन करण्यासाठी एल्प्रो सिटी स्क्वेअर मध्ये आले हते. लोकप्रिय अभिनेत्री करिष्मा कपूर आणि मराठी अभिनेत्री साई ताम्हणकर यांनीही एल्प्रो सिटी स्क्वेअरला भेट दिली. आज एल्प्रो सिटी स्क्वेअरने आपला खास ठसा उमटविला आहे.
उत्सवाचा काळत एल्प्रो सिटी स्क्वेअरने सेलिब्रेट जिंदगी नावाची आणखी एक मोहीम समोर आणली होती. सेलिब्रेट जिंदगीमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि लोकांना एल्प्रो सिटी स्क्वेअर येथे सणासुदीच्या काळात आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित केले.. एल्प्रो सिटी स्क्वेअरने दिवाळीच्या हंगामात सर्व ब्रांड्सवर रामायण बेस डिस्काऊंट दिले, दिवाळी मेळा आणि मनोरंजक स्पर्धांमध्ये अप्रतिम सवलतीसह मॉल ने ग्राहकांचे स्वागत केले. दिवाळी हंगामातील सर्वात मोठी स्पर्धा “शॉप टू विन” होती, ज्यामुळे ग्राहकांना दररोज आणि साप्ताहिक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली आणि यात अंतिम बम्पर बक्षीस होती – एक नवीन “मारुती सुझुकी डिजायर” सेडन. यात सर्व ग्राहकांना मॉलमध्ये ५९९९ ची खरेदारी करा आणि स्पर्धेत भाग घ्या ही ऑफर देण्यात आली होती. सर्व विजेत्यांची पारदर्शक पद्धतीने लकी ड्रॉद्वारे निवड केली गेली आणि मॉलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सच्या उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
जसा उत्सवाचा हंगाम जवळ येतो तशीतशी ही स्पर्धा बरेच काही घेऊन येते. एल्प्रो सिटी स्क्वेअर येथून बंपर प्राइज मिळवणाऱ्या – मारुती डिझायर सेडनच्या विजेत्याची घोषित करण्यासाठी एक विशेष बक्षीस हस्तांतर समारंभ आयोजित करण्यात आला होता. पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड – कृष्णा प्रकाश या समारंभामध्ये पारितोषिक हस्तांतरण सोहळ्यास सन्माननीय अतिथी होते, यांच्या समवेत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एल्प्रो इंटरनेशनल लिमिटेड – दीपक कुमार यांनी भाग्यवान विजेत्यास गाडीच्या चाव्या दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे कृष्णा प्रकाश म्हणाले, “स्पर्धेतील विजेत्यांचा आनंदोत्सव साजरा करण्याचा हा खास सोहळा पीसीएमसीच्या लोकांशी एल्प्रो सिटी स्क्वेअरची बांधिलकी दर्शवतो. आम्ही सुरक्षेसाठी व पीसीएमसीच्या लोकांच्या पुढील वाटचालीसाठी एल्प्रो सिटी स्क्वेअरला सहकार्याने कार्य करण्याचे सुनिश्चित करू. “कृष्णा प्रकाश हे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आहेत आणि त्यांनी देशाच्या सेवेसाठी अनेक नामांकित पुरस्कार आणि प्रशंसा मिळवली आहे. महाराष्ट्रातील शांतता आणि जातीय सलोखा कायम ठेवण्याच्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना महात्मा गांधी पीस अवॉर्ड मिळाला आहे आणि २० वर्षांपासून ते एक समर्पित लोक सेवक आहेत. २०१८ मध्ये आयर्नमॅन ट्रायथलॉन आणि अल्ट्रॅमॅन पदवी पूर्ण करणारे ते देशातील पहिले नागरी सेवक देखील आहेत.
