Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENT

सिद्धार्थ चांदेकर का म्हणतोय सांग तू आहेस का?

अग्निहोत्र, कश्याला उद्याची बात, जिवलगा यासारख्या गाजलेल्या मालिकांनंतर सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सांग तू आहेस का’ असं त्याच्या नव्या मालिकेचं नाव असून ७ डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होत आहे. यावर्षातला हा नवा प्रोजेक्ट असल्यामुळे सिद्धार्थ फारच उत्सुक आहे.   

या नव्या मालिकेविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण अग्निहोत्र ही माझी पहिली मालिका मी स्टार प्रवाहसोबत केली. चांगली वाहिनी, चांगली कथा, चांगली निर्मिती संस्था आणि चांगला दिग्दर्शक हा मेळ जुळून आल्यामुळेच ही मालिका मी स्वीकारली. लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मालिकेचा हा बाज माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. मी याआधी हॉरर जॉनरमध्ये काम केलेलं नाही. मालिकेचा सेटअप ज्यापद्धतीने तयार केला आहे तो प्रेक्षकांसाठी नक्कीच नवा अनुभव असेल. विशेष म्हणजे मालिकेत नवनवी सरप्राईजेस आहेत जी प्रत्येक भागात उलगडत जातील. या मालिकेची गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल याची मला खात्री आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading