Tuesday, June 16, 2026
Business

आयसीआयसीआय बँकेने जाहीर केली ‘कार्डलेस ईएमआय’ ही डिजिटल पद्धतीची नवी पेमेंट सेवा

मुंबई: आयसीआयसीआय बँकेने प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये पूर्णतः डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याची सेवा सुरू केल्याचे आज जाहीर केले आहे. ‘आयसीआयसीआय बँक कार्डलेस ईएमआय’ (इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स) असे नाव असणाऱ्या या सेवेमुळे पूर्व-मान्यताप्राप्त लाखो ग्राहकांना वॉलेट किंवा कार्ड याऐवजी केवळ मोबाइल फोन व पॅन यांचा वापर करून त्यांचे आवडते गॅजेट किंवा होम अप्लायन्सेस खरेदी करता येऊ शकते. त्यांना केवळ नोंदणीकृत मोबाइल नंबर, पॅन व (मोबाइल नंबरवर आलेला) OTP हा तपशील रिटेल आउटलेटमधील PoS मशीनवर देऊन, मोठ्या रकमेच्या व्यवहारांचे रूपांतर सुलभ, नो-कॉस्ट मासिक हप्त्यांमध्ये करता येऊ शकते.

रिटेल स्टोअर्समध्ये कार्डलेस ईएमआय ही पूर्णतः कार्डलेस सेवा देणारी आयसीआयसीआय बँक ही या उद्योगातील पहिलीच आहे. बँकेने ग्राहकांना क्रोमा, रिलायन्स डिजिटल, माय जिओ स्टोअर्स व संगीता मोबाइल्स अशा प्रमुख रिटेलरच्या देशभरातील आउटलेटमध्ये ही सेवा देण्यासाठी पाइन लॅब्स या आघाडीच्या मर्चंट कॉमर्स पोर्टलशी सहयोग केला आहे. या स्टोअर्समध्ये कॅरिअर, दैकिन, डेल, गोदरेज, हेअर, एचपी, लेनोव्हो, मायक्रोसॉफ्ट, मोटोरोला, नोकिया, ओप्पो, पॅनासॉनिक, तोशिबा, विवो, व्हर्पूल व मि अशा आघाडीच्या ब्रँडकडून इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ‘कार्डलेस ईएमआय’ सेवा मिळू शकते. बँक येत्या काही महिन्यांमध्ये या सुविधेअंतर्गत आणखी अनेक ब्रँडचा समावेश करणार आहे. तसेच, नजिकच्या काळामध्ये अनेक रिटेलर ही सेवा देणार आहेत.

या उपक्रमाविषयी, आयसीआयसीआय बँकेच्या अनसिक्युअर्ड अॅसेट्सचे प्रमुख सुदीप्त रॉय म्हणाले, “आयसीआयसीआय बँस नेहमीच ग्राहकांच्या सोयीचा विचार करते आणि त्यांना बँकिंग अधिक सुरळितपणे आणि सोयीस्करपणे करता यावे, या हेतूने नावीन्यपूर्ण सेवा उपलब्ध करते. होम अप्लायन्सेस, मोबाइल फोन व गॅजेट अशा वस्तू ईएमआय पद्धतीने खरेदी करणे भारतीयांना सोयीचे वाटते. क्रेडिट व डेबिट कार्डांवर ईएमआय सुविधा घेऊन असंख्य कन्झ्युमर ड्युरेबल खरेदी केले जात असल्याचे आम्ही पाहिले आहे.

ग्राहकांच्या आणखी सोयीच्या दृष्टीने आम्ही ‘कार्डलेस ईएमआय’ सेवा सुरू करत आहेत, जेणे करून ग्राहकांना त्यांचे कार्ड किंवा वॉलेट वापरावे न लागता, केवळ मोबाइल फोन व पॅन वापरून व्यवहार करता येऊ शकतो. या सेवेमुळे, सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या धामधुमीत आयसीआयसीआय बँकेच्या पूर्व-मान्यताप्राप्त लाखो ग्राहकांना पूर्णतः काँटॅक्टलेस, डिजिटल व सुरक्षित पद्धतीने खरेदी करता येऊ शकते.”

मुख्य कार्यकारी अधिकारी अमरिश राऊ यांनी सांगितले, “‘कार्डलेस ईएमआय’ ही नवी सेवा तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, परंतु ही सेवा अतिशय सुरक्षित आहे. यामुळे नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल आणि भारतभर 1 लाखाहून अधिक पाइन लॅब्स मर्चंटकडे खरेदी करता येईल व नंतर पैसे देण्याची सुविधा मिळवता येईल. या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रमासाठी आयसीआयसीआय बँकेशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading