fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTTOP NEWS

अभिनेता रितेश देशमुखने आईच्या साडीपासून शिवला ड्रेस

दिवाळीनिमित्त आपण नव्या कपड्यांचं शॉपिंग करतो. पण अभिनेता रितेश देशमुखने नवीन कपडे न घेता एक भन्नाट आयडिया लढवली आहे. यंदा रितेशने आईच्या जुन्या साडीपासून सदरा शिवला आहे. स्वत:ला आणि त्याच्या दोन्ही मुलांना असेच सदरे त्याने शिवून घेतले आहेत. विशेष म्हणजे त्याचा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ शेअर केला आहे. निळ्या रंगाचा सदरा आणि पांढऱ्या रंगाची सलवार यामध्ये रितेश आणि त्याची दोन्ही मुलं एकदम कडक दिसत आहेत.

अभिनेता रितेश देशमुखने व्हिडीओ शेअर करत दाखवलं आहे की, सुरुवातीला रितेश देशमुखच्या आई अर्थात वैशालीताई देशमुख यांनी त्यांची निळ्या रंगाची साडी फडकवली आहे आणि रितेश आणि त्याची मुलं सारख्याच रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालून दिसत आहेत. या व्हिडीओला रितेशने कॅप्शन दिलं आहे, ‘माँ की पुरानी साडी, बच्चों लिए नए कपडें..हॅपी दिवाली.’ हा व्हिडीओ जेनेलिया देशमुखने शूट केला आहे. सर्वसामान्य माणसं ज्याप्रमाणे जुन्या साड्यांचे ड्रेस किंवा आणि कुर्ता शिवतात. त्याप्रमाणे रितेशनेही टाकाऊतून टिकाऊची कल्पना वापरली आहे. रितेशच्या या व्हिडीओचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading