Saturday, September 5, 2026
BusinessTECHNOLOGY

टाटा स्काय बिंजने चित्रपट आणि खेळ ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी केली सोनी लिव्हशी भागीदारी

पुणे, दि. 2 – टाटा स्काय बिंज या टाटा स्कायच्या अॅग्रीगेटर सेवेने सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद वृद्धिंगत करण्यासाठी सोनीलिव्हशी भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे टाटा स्काय बिंजच्या रोमांचक कंटेंटमध्ये १००० हून अधिक तासांची भर पडणार आहे. यामध्ये टीव्ही शो, सिनेमे आणि सोनीलिव्ह ओरिजिनल्सचा समावेश आहे. स्कॅम १९९२ – द हर्षद मेहता स्टोरी, जेएल५०, अवरोध- द सीज विदिन, योर ऑनर, अनदेखी यांसारख्या  वेब सीरिज; कदाख, रामसिंग चार्ली आदी चित्रपटांचा यात समावेश आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स लिमिटेड कडील विस्तृत श्रेणीतील अनेक चित्रपट व निवडक टीव्ही शो तसेच लाइव्ह स्पोर्ट्स याद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

टाटा स्कायच्या चीफ कमर्शिअल व कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी या भागीदारीबद्दल म्हणाल्या, आमच्या ग्राहकांना नवीन कंटेंटच्या स्वरुपात निवडीसाठी विविध पर्याय मोठ्या संख्येने उपलब्ध करून देणे आम्हाला नेहमीच आवश्यक वाटते. आमच्या सबस्क्रायबर्सना सोनीलिव्हच्या अफलातून कंटेंट लायब्ररीद्वारे सर्वाधिक मनोरंजन व गुंतवून ठेवणारा कंटेंट टाटा स्काय बिंज प्लॅटफॉर्मवर निश्चित सापडेल अशी खात्री आम्हाला वाटते.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या डिजिटल बिझनेस व स्टुडिओनेक्स्टचे बिझनेस हेड दानिश खान या सहयोगाबद्दल म्हणाले, टाटा स्काय बिंजशी झालेल्या भागीदारीमुळे मोठ्या पडद्यावर कंटेंट बघणाऱ्या कुटुंबांमधील आमचे आघाडीचे स्थान आणखी भक्कम होईल. त्यामुळे टाटा स्काय बिंज वापरणाऱ्यांना निवडीसाठी मुबलक वाव मिळेल. या भागिदारीमुळे आम्हाला आमचे स्थान आणखी भक्कम करण्याची संधी मिळाली आहे. दोन्ही ब्रॅण्ड्समधील संबंध विस्तारण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.

टाटा स्काय बिंज हा एक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असून, अव्वल दर्जाचे ओटीटी आणि कॅच-अप टीव्ही कंटेंट यावर एकाच इंटरफेसद्वारे व एकाच सबस्क्रिप्शनमध्ये एकत्रित आणलेले आहेत. अमॅझोन फायर टीव्ही स्टिकची टाटा स्काय एडिशन किंवा टाटा स्काय बिंज प्लस अँड्रॉइड पॉवर्ड स्मार्ट सेट टॉप बॉक्स यांच्या माध्यमातून हे अॅक्सेस केले जाऊ शकते. भारतातील ९ अव्वल ओटीटी अॅप्सवरील मनोरंजनाचे अनेकविध पर्याय टाटा स्काय बिंज देऊ करते. या ओटीटी अॅप्समध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियम, झी5, सननेक्स्ट, हंगामा प्ले, इरॉस नाऊ, शेमारूमी, वूट सिलेक्ट, वूट किड्स आणि आता सोनीलिव्ह यांचा समावेश आहे. टाटा स्काय बिंजवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमेझॉन प्राइम व्हिडिओही तीन महिन्यांसाठी उपलब्ध आहे.

टाटा स्काय सबस्क्राइबर्सना दरमहा फक्त २९९  रुपयांमध्ये अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक-टाटा स्काय एडिशनच्या माध्यमातून टाटा स्काय बिंजवरील प्रीमिअम ओटीटी अॅप्सचा संग्रह उपलब्ध आहे. नव्या टाटा स्काय ग्राहकांना टाटा स्काय बिंज+ कनेक्शन २९९९ रुपये आणि आधीपासूनच्या टाटा स्काय ग्राहकांना ३९९९ रुपये  या सवलतीच्या दरात टाटा स्काय बिंज+ कनेक्शन मिळवता येईल. यात टाटा स्काय बिंज व्यासपीठाचे सहा महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत आहे. फायर टीव्ही स्टिक किंवा बिंज+ बॉक्सवरील टाटा स्काय बिंज ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त किमतीविना मागील सात दिवसांचे त्यांनी न पाहिलेले शोज (लिनीअर एनटायलमेंटवर आधारित) आणि अॅमेझॉन प्राइमचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शनही मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading