जगविख्यात पेनचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना संधी
पुणे : माँट ब्लांक…लॅमी…क्रॉस…पार्कर…वॉटरमन…शिफर…डिप्लोमॅट…वॉर्दर असे जगविख्यात कंपनींचे पेन आणि विशेषत: फाऊंटन पेन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. व्हिनस ट्रेडर्सच्या वतीने फाऊंटन पेन डे निमित्त इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात ५०० रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत पेन पाहायला मिळणार असून ४०० पेन चा समावेश यामध्ये आहे.
जगभरातील जर्मनी, अमेरिका, फ्रान्स मधील सुमारे २५ कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट पेनांचे प्रदर्शन व्हिनस ट्रेडर्सच्या शहरातील सहा शाखांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पेन कंपन्यांसोबतच भारतीय कंपनीच्या पेनचा देखील समावेश आहे. फाऊंटन पेन, रोलर पेन, बॉलपेन आदी प्रकारांमध्ये पेन प्रदर्शनात पाहायला मिळतात. अप्पा बळवंत चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कोथरुड, सिझन मॉल, वानवडी आणि बाणेर येथील व्हिनस टेÑडर्सच्या या सहा शाखांमध्ये प्रदर्शन आहे.
सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी फाऊंटन पेन डे चे आयोजन जगभरात केले जाते. फाऊंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाऊंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा, यासाठी या दिवसानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १५ नोव्हेंबर पर्यंत दिवसभर सर्व शाखांमध्ये प्रदर्शन सुरु राहणार आहे. तसेच +९१२०४१००६४४३ या व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून पुणेकरांना पेन कॅटलॉग देखील पाहता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
