कोरोना – राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.३१ टक्क्यांवर
पुण्यात 133 नवीन पॉझिटिव्ह
मुंबई, दि. २ : आज १०,२२५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,२४,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.३१ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ४,००९ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज १०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,६५,१६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८७,७८४ (१८.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २५,३३,७८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,१९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज रोजी एकूण १,१८,७७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
पुणे कोरोना अपडेट
2 नोव्हेंबर – सोमवार
…….
- दिवसभरात 133 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 154 रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात 15 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. 02 रूग्ण पुण्याबाहेरील.
- 546 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 324 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या- 161844
- ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 5696
- एकूण मृत्यू – 4259
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 151889
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 1176
