IPL 2020 – चेन्नईचा पंजाबवर सुपर विजय

दुबई – आयपीएलच्या तेराव्या हंगमात प्ले ऑफमध्ये खेळण्याचं पंजाबचं स्वप्न अखेर स्वप्न राहणार आहे. कारण १५४ धावांचं आव्हान चेन्नई सुपर किंग्सनं लिलया पेललं आणि पंजाबचा धोबीपछाड केला. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यू प्लेसिस या जोडीनं 82 धावांची सलमी दिली. ख्रिस जॉर्डननं ही जोडी फोडताना ड्यू प्लेसिसला माघारी धाडलं. ड्यू प्लेसिसनं 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावा फटकावल्या.

ऋतुराज गायकवाडनं अंबाती रायुडूला साथीला घेत चेन्नईला विजयपथावर नेलं. ऋतुराजनं सलग तिसरं अर्धशतक झळकावताना 49 चेंडत 62 चेंडूत धावांची खेळी केली. तर रायुडून 30 चेंडूत नाबाद 30 धावांचं योगदान दिलं. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची अभेद्य भागीदारी रचली.

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना पंजाबनं 20 षटकात सहा बाद 154 धावांची मजल मारली. पंजाबकडून दीपक हुडानं एकाकी झुंज देताना नाबाद 62 धावा केल्या. पंजाबचे आघाडीचे चारही फलंदाज लवकर माघारी परतले. कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अगरवालनं 48 धावांची सलामी दिली. पण मयांकनंतर राहुल, गेल आणि निकोलस पूरन लागोपाठ बाद झाल्यामुळे पंजाबची अवस्था 4 बाद 72 अशी झाली होती. या परिस्थितीत दीपक हुडानं एका बाजूनं किल्ला लढवला. हुडाची 62 धावांची खेळी ही त्याच्या आजवरच्या आयपीएल कारकीर्दीतली सर्वोत्तम खेळी ठरली.

चेन्नईच्या या विजयासह पंजाबचं आयपीएलमधलं आव्हानही संपुष्टात आलं. परतीच्या सलग पाच सामन्यात विजय मिळवून पंजाबनं चांगलं कमबॅक केलं होतं. पण राजस्थान आणि आज चेन्नईविरुद्ध असे सलग दोन सामने गमावल्यानं पंजाबला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. पंजाबनं यंदाच्या मोसमात 14 पैकी सहा सामन्यात विजय मिळवला तर आठ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

Leave a Reply

%d bloggers like this: