Saturday, June 20, 2026
MAHARASHTRATOP NEWS

एकनाथ खडसे यांच्या वाहनाला अपघात

जळगाव, दि. १ – भाजपला रामराम ठोकून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे रविवारी थोडक्यात बचावले. खडसे यांच्या धावत्या वाहनाचं टायर फुटलं. वाहनचालकानं प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वाहनाचा अपघात होता होता वाचला आणि एकनाथ खडसे थोडक्यात बचावले.

धरणगाव-जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते. धरणगाव- जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर त्यांचं वाहन येताच वाहनाचे टायर फुटलं. वाहन चालकानं प्रसंगावधान राखून क्षणात वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. एकनाथ खडसे सुखरुप असून अपघातग्रस्त वाहन जागेवरच सोडून ते दुसर्‍या वाहनाने जळगावकडे रवाना झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading