पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

वनराई  आणि दिपस्तंभ संस्थेतर्फे शासकीय सेवा योजना  मदत व मार्गदर्शन प्रकल्प चे आयोजन 

पुणे: “शासनाच्या अनेक योजना असून सामान्य नागरिकांना माहिती नसते. आशा विविध शासनाच्या योजनांची माहिती आणि लाभ लाभार्थींना सहजासहजी मिळावे यासाठी शासकीय सेवा योजना  मदत व मार्गदर्शन प्रकल्प’ अंतर्गत काम सुरू आहे. पात्र लभार्थींना योजनेचे स्वरूप त्यासाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे मिळणार लाभ याबाबत जनजागृती केली जाणार आहे.” अशी माहिती महसुल विभागाचे माजी उप-आयुक्त व दीपस्तंभ संस्थेचे अध्यक्ष के. सी. कारकर यांनी दिली.

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘वनराई’ आणि दिपस्तंभ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासकीय सेवा योजना  मदत व मार्गदर्शन प्रकल्प’  ओळख कार्यक्रम व गावनिहाय प्रमुख कार्यकर्ते प्रशिक्षण ग्रामीण भागातील गावात देण्यात आले. तसेच संस्थेतर्फे भोर गावातील ग्राम विकास प्रशिक्षण केंद्र येथे भजनांचा कार्यक्रमात आयोजित करून डॉ. मोहन धारिया यांच्या आठवणींना ग्रामस्थांनी उजाळा दिला.

तसेच मार्गदर्शन शिबिर सातारा जिल्ह्यातील खंडाळा गावातील  क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, वनराई मुख्य प्रकल्प संचालक जयवंत देशमुख, महसुल विभागाचे माजी उप-आयुक्त व दीपस्तंभ संस्थेचे अध्यक्ष के.सी.कारकर, सामाजिक कार्यकर्ते सूरज पोळ, शेतकरी नेते प्रमोद जाधव उपस्थित होते. 

वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया म्हणाले,”वनराईतर्फे ग्रामीण भागात काम सुरू असून एकात्मिक ग्राम असं जेव्हा गावाचा विकास करायचं असेल तर शासनाच्या सेवा योजनाची माहिती आणि लाभ गावातील लोकांना मिळावे यासाठी वनराई आणि दिपस्तंभ संस्था एकत्र येऊन ‘शासकीय सेवा योजना  मदत व मार्गदर्शन प्रकल्प’  अंतर्गत ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे काम करणार आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: