fbpx
Monday, June 17, 2024
Business

महिंद्राने दाखल केली नवी ट्रिओ झॉर इलेक्ट्रिक 3-व्हीलर कार्गो

बेंगळुरू, दि. 29 –  महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. या 19.4 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने भारतात ट्रिओ झॉर हे नवे इलेक्ट्रिक 3-व्हीलर कार्गो मॉडेल दाखल केल्याचे आज जाहीर केले आहे.  या मॉडेलची किंमत 2.73 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली, नेट ऑफ FAME 2 व स्टेट सबसिडीज) आहे. ट्रिओ झॉर ही प्रसिद्ध ट्रिओ सुविधेवर आधारित आहे आणि त्यामध्ये 3 प्रकार उपलब्ध आहेत – पिकअप, डेलिव्हरी व्हॅन व फ्लॅट बेड. ही वाहने भारतातील निवडक शहरांमध्ये महिंद्रा स्मॉल कमर्शिअल डीलरशिपमध्ये डिसेंबर 2020 पासून उपलब्ध होतील.

ट्रिओ झॉर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. देखभालीसाठी प्रति किमी केवळ 40 पैसे* इतका कमी खर्च येत असल्याने सध्याच्या डिझेल कार्गो 3-व्हीलर्सच्या तुलनेत हे वाहन दरवर्षी 60,000+ रुपये बचत करते*. हे वाहन 8kW इतकी या उद्योगातील सर्वोत्तम** पॉवर आणि 42 Nm टॉर्क इतके श्रेणीतील सर्वोत्तम*** टॉर्क देते. 550 किलो पेलोड हेही ट्रिओ झॉरचे श्रेणीतील सर्वोत्तम*** वैशिष्ट्य आहे.

वाहन दाखल केल्याबाबत, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन गोएंका म्हणाले, “महिंद्राच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त, आम्ही स्वच्छ, हरित व तंत्रज्ञानाने जोडलेल्या भविष्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरित आहोत. सर्वत्र कनेक्टिविटी देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करण्यामध्ये जगभरात आघाडी घेण्यासाठी भारताकडे मोठी क्षमता आहे, असे मला वाटते. ट्रिओ सुविधेतून, नवे तंत्रज्ञान व मेक इन इंडिया याद्वारे आमची आत्मनिर्भर भारतसाठीची बांधिलकी दिसून येते. सर्वदूर डिलेव्हरी देण्यासाठी ट्रिओ झॉर स्वच्छ, शाश्वत व किफायतशीर सेवा देणार आहे.“

या निमित्ताने, महिंद्रा इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी सांगितले, “ट्रिओ या प्रसिद्ध 3-व्हीलर सुविधेने भारतीय रस्त्यांवर 35 दशलक्ष किमीहून अधिक प्रवास करणारे 5,000+ समाधानी ग्राहक मिळवून अगोदरच सर्वदूर वाहतूक सुविधा दिली आहे. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या हेतूने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रिओ झॉर विकसित केली आहे आणि ती ग्राहकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी 3 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ट्रिओ झॉर दरवर्षी 60,000+ रुपयांपर्यंत ग्राहकांना बचत करण्याची सुविधा देणार आहे, तसेच यामुळे ग्राहकांना त्यांच्या अपेक्षा व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे आणि सर्वदूर डिलेव्हरी देणे शक्य करणार आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading