‘बाबा’ तुम्ही व्यापाऱ्यांची अजिबात ‘माफी’ मागायची नाही…

हमाल, मापाडी, कष्टकरी, कामगार, शेतकरी, तोलणार, कागद-काच-पत्रा गोळा करणारी मंडळी, रिक्षा पंचायत ह्या काबाडकष्ट करणाऱ्यांचे नेते म्हणजे डाॕ. बाबा आढाव एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. ९० वर्षा पर्यंतचे संपूर्ण आयुष्य बाबांनी गोरगरिबांसाठी घालवलं. संयमी, मृतभाषी व सत्यशोधक चळवळीतील आमचे प्रेरणास्थान महात्मा फुलेंचा वसा आणि वारसा डॉ. बाबा आढाव समर्थपणे चालवत आहेत. कष्टऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला व सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, हाच बाबांच्या कामाचा आदर्श आहे. म्हणून पुण्यासह महाराष्ट्रभर हजारो लाखो कार्यकर्ते बाबांच्या विचारांची त्यांच्या कामाशी जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते सुद्धा बाबांच्या कर्तृत्वा समोर नतमस्तक होतात. हा डॉक्टर बाबा आढाव यांचा आदर्श आहे. डॉ. बाबा आढाव नुसते कष्टकऱ्यांचे नेते नाहीत तर ते जेष्ठ इतिहास संशोधक आणि महाराष्ट्रभूषण आहेत.

पुण्यातील दीड-दमडीच्या मुजोर व्यापाऱ्यांनी डॉ. बाबा आढाव यांनी माफी मागावी अशी मागणी ‘पुना मर्चंट चेंबर’ संघटनेने केलेली आहे. त्या व्यापाऱ्यांचा आम्ही ‘संभाजी ब्रिगेड’ च्या वतीने सर्वप्रथम निषेध करतो. बाहेरच्या राज्यातून पोट भरायला आलेले परप्रांतीय व्यापारी जर आमच्या आदर्श असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या नेत्याला माफी मागायला लावत असतील तर खबरदार… तुमच्या कानाखाली ‘आवाज’ काढण्यात येईल…!

ज्यांचे पोट पाठीला चिटकलेले आहे, अशा कष्टकऱ्यांचे डॉक्टर बाबा आढाव नेते आहेत. हमाल, तोलणार किंवा कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी शाळा काढली. महामंडळाची स्थापना केली. झुणका भाकर केंद्र बाबांचा आदर्श प्रकल्प. हजारो महिला व पुरुषांच्या हाताला काम मिळवून देणारा एक समाजसुधारक. त्यांच्या न्याय हक्क अधिकार यासाठी आजही ते रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. नव्वद वर्षाचा तरुण जर हक्काने व्यापारी किंवा सरकारला बोलत असेल तर ते त्यांनी संयमाने ऐकून घेतलं पाहिजे. दीड-दमडीच्या व्यापाऱ्यांनी विनाकारण स्वतःच्या इगो’चे (फुटकल स्वाभिमान) भांडवल करून डॉ. बाबा आढाव यांना माफी मागायला लावत असतील तर व्यापाऱ्यांना सावधान… गाठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आहे. लक्षात ठेवा, आम्ही तुमच्यावर शेतकऱ्यांचा आसूड उगारल्यास राहणार नाहीत.

व्यापाऱ्यांचे नुकसान झाले पाहिजे अशी बाबांची कधीही इच्छा नसेल व नाही. प्रत्येक जण जगला पाहिजे ही साधा सरळ भूमिका असते. पुण्यातील व्यापाऱ्यांनी डॉ. बाबा आढाव यांचा सामाजिक इतिहास तपासावा आणि बोलताना माफी मागायला लावण्यापर्यंत तुमची लायकी आहे का…? हे तपासावे. बाबा तुम्ही अजिबात माफी मागायची गरज नाही. आम्ही तुमच्या सदैव सोबत आहोत. फक्त आवाज द्या… हजारो मावळे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून या पुण्यातील मुजोर व्यापाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करायला तयार आहेत.

तरुणांना लाजवेल असं डॉ. बाबा आढाव यांचं काम आहे. ज्यांचे पोट पाठीला चिटकलेले आहे अशा गरीब, कष्टकऱ्यांचे डॉक्टर बाबा आढाव नेते आहेत. आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून आम्ही समता, समानता व बंधुचा प्रस्थापित करणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांच्या पाठीशी खंबीरपणे सोबत आहोत.

‘बाबा’ मुजोर व्यापाऱ्यांना काडीचीही किंमत देऊ नका, आणि अजिबात माफी मागू नका…

जय जिजाऊ…! जय शिवराय…!!

आपला – संतोष शिंदे,
मा. जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.
9850842703, 9423734817

Leave a Reply

%d bloggers like this: