PMPML – पुणेकरांना फक्त 5 रुपयांत प्रवास करता येणार

पुणे, दि. 21 – पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) या वतीने दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना एक आगळी-वेगळी भेट देण्यात आली आहे. त्यानुसार आता पुणेकरांना पाच रुपयांत पुण्यातील 37 मार्गावर प्रवास करता येणार आहे.

पीएमपीएमएलच्या वतीने ही योजना अटल प्रवास योजना म्हणून पुणेकरांसाठी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार उपस्थित होते. या उपक्रमामुळे पुणेकरांना आता दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, या उपक्रमाचे उद्घाटन दसऱ्याच्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: