माळी समाजाच्या पहिल्याच ऑनलाईन वधूवर परिचय मेळाव्याला प्रतिसाद

पुणेः- कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर माळी समाजाच्या पहिल्याच ऑनलाईन मेळाव्याला भारतासह परदेशातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. माळी समाज ऑनलाईन परिचय संमेलन २०२० समितीचे अध्यक्ष पुण्याचे रवि चौधरी यांनी माळी समाजाच्या सर्व शाखीय, सर्व वर्ग म्हणजेच विधवा, विदूर ,घटस्फोटित, अपंग यांच्यासाठी या अभिनव परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार छगनराव भुजबळ आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

यामध्ये 303 वर आणि 369 वधू सहभागी झाल्या होत्या. दिवसभरात 227 पेक्षा जास्त झूम मिटींग यशस्वी झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ दत्तात्रय बाळसराफ, राधेश्याम चरडे, श्रीकांत लखोटीया, रश्मी पांढरे आणि रवि चौधरी यांच्या हस्ते श्रीसंत सावता महाराज , समाज क्रांतीकारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी माजी महापौर अंकुश काकडे यांनी ‘ऑनलाईन लग्न व्यवस्था’ याविषयी वधूवरांना मार्गदर्शन केले. तसेच माजी आमदार कमलताई ढोलेपाटील ,माजी आमदार बाळासाहेब शिवरकर , ज्येष्ठ उद्योजक दिपक कुदळे ,शेखर मुंदडा यांचे मार्गदर्शन लाभले.
हा मेळावा यशस्वी होण्यासाठी डॉ राजेश इंगळे, प्रदीप जगताप, रोहिणी रासकर,गायत्री चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले. सूत्रसंचालान अभयजी जाजू यांनी केले. रश्मी पांढरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: