fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

नीता कुलकर्णी आणि निखिल दाते यांना ‘मसाप’ चा मोरेश्वर नांदुरकर उत्तेजन पुरस्कार

पुणे : ‘रसिक साहित्य’च्या माध्यमातून साहित्य क्षेत्रासाठी मोलाचे योगदान देणारे मोरेश्वर नांदुरकर यांच्या जयंती दिनी  महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि नांदुरकर कुटुंबीय याच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हे पुरस्काराचं दुसरं वर्ष आहे. संपादन क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठीचा या वर्षीचा मोरेश्वर नांदुरकर संपादक उत्तेजन पुरस्कार नीता कुलकर्णी (पुणे) यांना आणि पुस्तक  विक्रीच्या उत्तम कामगिरीसाठीचा मोरेश्वर नांदुरकर पुस्तक विक्रेता उत्तेजन पुरस्कार नाशिकच्या पुस्तक पेठेचे निखिल दाते यांना जाहीर झाला आहे. २५००० रुपये  आणि सन्मानपत्र असे या  पुरस्काराचे स्वरूप आहे.  २४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि निर्माते श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेचे  प्रमुख  कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, मोरेश्वर नांदुरकर यांच्या पत्नी सुनीता नांदुरकर, मुलगी धनश्री कुलकर्णी, रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर आणि सहयोगीचे योगेश नांदुरकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली. हा कार्यक्रम मसाप, रसिक साहित्य, सहयोगी या फेसबुक पेजेसवर ऑनलाईन बघण्याची सोय केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading