राज्यात आज कोरोनाचे १५ हजार ४८ रुग्ण बरे; तर १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद

पुण्यात ९९३ पॉझिटिव्ह तर १४२८ कोरोना मुक्त

मुंबई, दि.४: राज्यात आज कोरोनाचे १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५५ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.२९ टक्के) आले आहेत. राज्यात  २२ लाख  ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले

आज निदान झालेले १३,७०२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-२१०९ (४८), ठाणे- २४८ (२), ठाणे मनपा-३६० (७), नवी  मुंबई मनपा-२७८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-४१४ (८), उल्हासनगर मनपा-५२, भिवंडी निजामपूर मनपा-५३ (२), मीरा भाईंदर मनपा-१९९ (५), पालघर-१२० (२), वसई-विरार मनपा-१३६ (२), रायगड-१९२ (५), पनवेल मनपा-१७१ (३), नाशिक-३३८ (२), नाशिक मनपा-६६४ (६), मालेगाव मनपा-३२, अहमदनगर-५४४ (७), अहमदनगर मनपा-९५, धुळे-१५ (१), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-१४० (७), जळगाव मनपा-८३ (१), नंदूरबार-२३, पुणे- ८१४ (१२), पुणे मनपा-१०३३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-४९६ (४), सोलापूर-३६० (५), सोलापूर मनपा-६० (१), सातारा-६४५ (४८), कोल्हापूर-१९८ (६), कोल्हापूर मनपा-५९ (२), सांगली-४०३ (११), सांगली  मिरज कुपवाड मनपा-६९ (३), सिंधुदूर्ग-२५ (३), रत्नागिरी-८१ (४), औरंगाबाद-५५ (१),औरंगाबाद मनपा-१९३ (५), जालना-८६ (४), हिंगोली-२८ (१), परभणी-६४, परभणी मनपा-२६ (३), लातूर-११३ (२), लातूर मनपा-७९ (२), उस्मानाबाद-१३६ (२), बीड-१५८ (१०), नांदेड-५६ (२), नांदेड मनपा-५८ (१), अकोला-२० (१), अकोला मनपा-४७, अमरावती-५८ (१), अमरावती मनपा-९७ (५), यवतमाळ-१०५ (५), बुलढाणा-११८, वाशिम-९८, नागपूर-२८० (४), नागपूर मनपा-६३७ (२२), वर्धा-१३३, भंडारा-१३४ (२), गोंदिया-१३० (८), चंद्रपूर-१२०, चंद्रपूर मनपा-७८, गडचिरोली-५३, इतर राज्य-८ (३).

पुणे अपडेट दिवसभरात ९९३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.- दिवसभरात १४२८ रुग्णांना डिस्चार्ज.- पुण्यात ५५ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १७ रूग्ण पुण्याबाहेरील.- ८९९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५०४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १४९३९९.- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५३९९.- एकूण मृत्यू -३६४७.-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १३०३५३.- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४५८०

Leave a Reply

%d bloggers like this: