Tuesday, June 23, 2026
ENTERTAINMENT

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ‘ईडी’ ची एन्ट्री

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात ४० लोकांची आत्तापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. त्यातच सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी याप्रकरणात पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनीही हाती घेतला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर आर्थिक आरोपही केले असून, ईडीनं या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलीस चौकशी करत असताना सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात फिर्याद दिली होती. त्यावरून रिया विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या फिर्यादीमध्ये रियाने आर्थिक फसवणुकीचा आरोप केला असल्यामुळे ईडी त्याबाजूने तपास करणार आहेत.

के.के. सिंह यांनी रियानं सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा ईडी आता या अंगाने तपास करणार आहेत. ईडीनं सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीची माहिती आणि सर्व बँक खात्यांची माहिती मागवली आहे. या माहितीची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading