Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

केजी ते बारावीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑनलाईन शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यात येत आहे. या पद्धतीसाठी राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यासाठी शालेय शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

या वेळापत्रकानुसार पूर्व प्राथमिक आणि इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ३० मिनिटांचे ऑनलाईन शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर, तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची दोन सत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

यामध्ये पूर्व प्राथमिक ते दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही ऑनलाईन सेशनमध्ये उपस्थित राहावं लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलेला अभ्यास पालकांमार्फत समजून सांगण्यात मदत होईल, असं सांगण्यात आलंय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading