निगेटिव्ह अहवालाचे वृत्त खोटे; अमिताभ बच्चन यांचा खुलासा

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. मात्र ही बातमी खोटी असल्याचं खुद्ध अमिताभ बच्चन यांनीच सांगितलं आहे. त्यांनी एका बातमीचा व्हिडिओ पोस्ट करत ही बातमी खोटी असून बनावट असल्याचंही म्हटलं आहे.
.. this news is incorrect , irresponsible , fake and an incorrigible LIE !! https://t.co/uI2xIjMsUU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 23, 2020
११ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तसंच, आराध्या आणि ऐश्वर्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. या चौघांनाही कोरोनातून लवकर मुक्ती मिळावी याकरता देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहेत. त्यातच, अमिताभ बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती समाजमाध्यमावर पसरली. मात्र ही बातमी खोटी असल्याची त्यांनी सांगितलं.
