फेक फॉलोअर्स – दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा मुंबई क्राईम ब्रँचच्या रडारवर
भारतातील पहिलीच घटना
सोशल मीडियावर कोणाचे किती फॉलोअर्स आहेत याला सेलेब्रेटींमध्ये फार महत्त्व आहे. या फॉलोअर्सच्या संख्येवरून त्या व्यक्तीला जाहिराती साठी मोठी रक्कम मिळते. पत्यामुळे आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेक सेलेब्रेटी काळाबाजार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्रिकेटपटू, बॉलिवूड सेलिब्रिटींना जितके अधिक फॉलोअर्स तितकी जास्त किंमत असं गणित डिजीटल मार्केटिंग जगातील लोकप्रियतेसाठी मांडलं जातं. मात्र आता खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

यासाठी पोलिसांनी १० जणांची यादी तयार केली आहे. या यादीतील सर्वात महत्त्वाची दोन नावं म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच या दोन्ही अभिनेत्रींची चौकशी करणार आहे. इंस्टाग्रामच्या भाषेत फेक फॉलोअर्सला बोट्स असं म्हणतात. याच ‘बोट्स’च्या मदतीने अनेक कलाकार आणि प्रभावशाली व्यक्ती आपल्या फॉलोअर्सची संख्या फुगवून दाखवतात. हे बोट्स विकत घेतलेले असतात. म्हणजेच पैसे देऊन फॉलोअर्सची संख्या वाढवता येते.
फार महत्त्व आहे. या फॉलोअर्सच्या संख्येवरून त्या व्यक्तीला महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेक सेलेब्रेटी काळाबाजार करत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कारण अनेक सेलिब्रिटींनाही त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ही खूप महत्वाची वाटते. जितके अधिक फॉलोअर्स तितकी जास्त किंमत असं गणित या डिजीटल जगातील लोकप्रियतेसाठी मांडलं जातं. मात्र आता खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.