fbpx
Saturday, April 27, 2024
PUNE

उद्यापासून पुण्यातील ‘लॉकडाऊन’ उठणार !! 13 जुलैच्या अगोदरचे निर्बंध कायम – सौरभ राव

पुणे, दि. 23 – शहरात शुक्रवारपासून लॉकडाऊन नसेल. मात्र तेरा जुलैच्या अगोदर शासनाने आणि महानगरपालिकेने जाहीर केलेली नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय विशेष अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हापरिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आदी उपस्थित होते. यावेळी राव म्हणाले की, लॉकडाऊन उठवताना 13 जुलैच्या अगोदरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार किंवा मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी इथून पुढे लॉकडाऊन घालण्याचा आमचा विचार असल्याचं त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पुण्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे फायदे येत्या काही दिवसांमध्ये दिसतील. रुग्णांची साखळी तुटल्याने रुग्णसंख्या काही दिवसांनी कमी येईल. दोन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव व्यापार्‍यांनी दिलेला आहे. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

31 जुलैपर्यंत केंद्र सरकारने घालून दिलेले लॉकडाऊनचे नियम पाळण्यात येणार आहे. 13 जुलैच्यापूर्वी पुणे महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या निर्बंध संदर्भात एक नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. हीच नियमावली पुढेही लागू राहिल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading