fbpx
Saturday, April 27, 2024
PUNE

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठा नाही – संभाजी ब्रिगेड

पुणे, दि. 23 – छत्रपती शिवाजी महाराजांनी पेक्षा कोणीही मोठा नाही. शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष असल्यामुळे त्यांचा दिल्लीच्या संसदेत सुद्धा जयघोष झाला पाहिजे. मात्र जय भवानी, जय शिवराय…!! घोषणा दिल्या नंतर ज्या शिवद्रोह्याना पोटात आग लागली. त्यांना समाज कधीही माफ करणार नाही जे व्यंकय्या नायडू संसदेच्या सभागृहांमध्ये सर्वोच्च खुर्चीवर बसले आहेत ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन म्हणून छत्रपतींचा आणि त्यांच्या वंशजांचा अपमान केल्याप्रकरणी व्यंकय्या नायडू इतर नेत्यांनी यांनी महाराष्ट्रासह देशाची माफी मागितली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेड ची भूमिका आहे.

रायगडावर जाऊन छत्रपतीच्या समाधीसमोर नाक घासलं गेलं. छत्रपतिंचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ…! अशी घोषणा देऊन भाजपने शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून महाराष्ट्रात भाजपने मतांची भीक मागितली आणि त्यात मतांच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. छत्रपती किंवा छत्रपतींच्या वंशाचा अपमान संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही.

संसदेचे सभाग्गृह जागेवर उभा आहे, ती जागा सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दान केलेली जमीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा साम्राज्याच्या कर्तृत्वाचा वसा आणि वारसा जगाला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे दान केलेल्या जमिनीच्या सभागृहात छत्रपतींचा अपमान हा शिवद्रोह आहे. म्हणून या विरोधात संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने ‘१ लाख पत्र’ मा. व्यंकय्या नायडू यांना आम्ही पाठवणार आहोत.

पत्र पाठवताना… संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, सचिव महादेव मातेरे, भोर तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे, विराज तावरे, विकास मोरे आदी उपस्थित होते.

जय जिजाऊ… जय शिवराय…, जय भवानी… जय शिवराय…, छत्रपती शिवाजी महाराज की… जय…या घोषणा नसून एक प्रेरणादायी जय जयकार आहे. हे काँग्रेस भाजप आणि इतर पक्षांनी लक्षात घ्यावे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading