Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

कोरोना चिंता वाढली – राज्यात आज तब्बल १० हजार ५७६ नवीन रुग्ण, २८० मृत्यू

पुण्यात दिवसभरात १७५१ पाझिटिव्ह, ३९ मृत्यू

मुंबई, दि.२२: राज्यात आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २८० मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे-१६, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-३,कल्याण-डोंबिवली मनपा-६, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर-७, वसई-विरार मनपा-४,पालघर-१,रायगड-१,पनवेल-३, नाशिक-२, नाशिक मनपा-४, अहमदनगर-३, अहमदनगर मनपा-३, धुळे-१, जळगाव-८, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-३, पुणे मनपा-३६, पिंपरी-चिंचवड मनपा-१८,सोलापूर-६, सोलापूर मनपा-६, सातारा-२, कोल्हापूर-६, कोल्हापूर मनपा-१०, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-३, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-२३, जालना-१, हिंगोली-१, परभणी-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड मनपा-३, अकोला-१, अकोला मनपा-२, बुलढाणा-१, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

पुणे कोरोना अपडेट

– दिवसभरात १७५१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ८८३ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ३९ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. सहा रूग्ण पुण्याबाहेरील.
– ६०९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ९४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४२४६६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १६२६९.
– एकूण मृत्यू -१०६८.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- २५१२९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७५९५

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading