सुसाईड ऑर मर्डर? – सुशांतसिंह राजपूतच्या जीवनावर येणार चित्रपट
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता महिना पुर्ण झाला आहे. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत. आता सुशांतच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सुसाईड ऑर मर्डर? असं याब चित्रपटाचं नाव आहे.

या चित्रपटात सुशांतच्या कारकिर्दीचा प्रवास असेल. शिवाय आऊटसायडर्सना मिळणारी वागणूक, नेपोटीझम असा सगळा मसाला असेल. सध्या त्याच्यावरील या चित्रपटाच्या लेखनाचं काम सुरू आहे. १६ सप्टेंबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात येईल. विशेष म्हणजे रायबरेलीचा सुशांतसारखा दिसणारा सचिन तिवारी यात भुमिका साकारणार आहे.
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याची चर्चा त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर होऊ लागली. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूला एका महिना उलटला असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सिनेजगतातील काही लोकांची चौकशी केली आहे. आतापर्यंत ३० हून अधिक जणांना वांद्रे पोलिसांनी बोलावून घेत सुशांतच्या मृत्यूसंंबंधी चौकशी केली.
