Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

खासदार फौजिया खान कोरोना पॉझिटिव्ह

परभणी, दि. 21 – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. फौजिया खान यांच्या परभणीतील नांदखेडा रोड येथील घरासह संपूर्ण परिसर सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading