Saturday, June 20, 2026
PUNE

पुण्यातील लॉकडाऊन उद्यापासून शिथिल

पुणे, दि. 18 – कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा पहिला टप्पा आज मध्यरात्री संपत आहे. त्यामुळे उद्या ( रविवार ) पासून शहरातील लॉककडून शिथिल करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्याबाबत सुधारित आदेश काढले असून रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार आहेत. यामध्ये त्यात, किराणा, भाजी तसेच चिकन, मासे आणि अंडी यांच्या दुकानाचा समावेश असणार आहे.

यापूर्वीच्या आदेशात रविवारी ही दुकाने सकाळी 8 ते 12 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती. दरम्यान, सोमवारपासून पुन्हा अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेतच सुरू असणार आहेत. रविवारी दिवसभर एकाच दिवसासाठी अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना आखडचा शेवटचा रविवार आणि गटारी अमावस्या साजरी करता येणार आहे. मात्र, या आदेशानुसार वाईन शॉप मात्र, 24 जुलै पर्यंत बंदच असणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading