मी अजूनही काँग्रेसचा कार्यकर्ता – सचिन पायलट
जयपूर, दि. 15 – आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल, तसेच मी अजूनही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असं देखील सचिन पायलट यांनी म्हटले आहे.

राजस्थानमधील बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई करत उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली आहे. यानंतर सचिन पायलट काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे. पायलट भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, मी भाजपमध्ये जाणार नाही असं पायलट यांनी जाहीर केलं आहे.
