fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

बाराव्या आंतरशालेय मान्सून चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे, दि. १४ – मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन विद्यांचल हायस्कूल कायम उपक्रमशील राहिली आहे. व गेली ११ वर्ष आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करीत आहे. यंदा करोना संकटामुळे प्रत्यक्ष चित्रकला स्पर्धक येऊ शकले नसले तरी शाळेने आंतरशालेय मान्सून चित्रकला स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थ्याना एक मोठी स्पर्धा उपलब्ध करून दिली. ऑनलाईन आंतरशालेय मान्सून चित्रकला स्पर्धेसाठी ६०० मुलांनी सहभाग घेतला होता त्यासाठी महाराष्ट्रातील ४५ शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल फेसबुक व झुमदावारे १२ जुलैला प्रसारित केला गेला.

या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून चेतना सुदामे (ऑस्ट्रेलियातील कालाकर एमआयटी, एडीटी विद्यापीठातील प्राध्यापक) तसेच पुनीता रंजन (डायरेक्टर टीएडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी कला व स्थापत्यशास्त्राशी संबंधीत आहे) या परीक्षक म्हणुन उपस्थित होत्या. या स्पर्धेच्या बक्षिसांचे प्रायोजक होत्या अनघा कुंटे (अण्णांज बेकिंग स्टुडियो, औंध) यांच्यातर्फे बक्षिस देण्यात आले. ही स्पर्धा अतिशय उस्ताहात पार पडली . विजेत्या स्पर्धकांचे परिक्षकांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता फडके व चित्रकला शिक्षकांनी मार्गदर्शन केलेे. १२ वी आंतरशालेय मान्सून चित्रकला स्पर्धा २०२० -२१ मधील विजेती मुले खालीलप्रमाणे विजेता ५ वी –

अनया नवले- डॉ.कलमाडी हायस्कूल पुणे (प्रथम विजेती) नंदिता गरूड- काशी विश्वेश्वर इंग्रजी माध्यम शाळा पुणे (व्दितीय विजेती ) सौरव कुंभार – आश्विनी इंटरनॅशनल स्कूल पुणे ( तृतीय विजेती ) विजेता ६वी – उदय फडतरे- पुणे इंटरनॅशनल स्कूल पुणे (प्रथम क्रमांक) अभिनव लांडे- पी.इ.एस महाराष्ट्र स्कूल पुणे (व्दितीय विजेती ) इरा दासवानी- विद्याव्हॅली स्कूल पुणे (तुतीय विजेती) विजेता वर्ग ७ वी अर्णव झनवर -डॉ.कलमाडी हायस्कूल पुणे (प्रथम विजेती) प्रसाद बनैत -बेकॉन स्कूल पुणे (व्दितीय विजेती) ऋतुजा कुंभार- आश्विनी इंटरनॅशनल स्कूल पुणे (तुतीय विजेती) विजेता ८ वी स्वरा गायकवाड- बी.पी.ई.एस स्कूल मुंबई (प्रथम विजेती) हमजा बारी- बी.पी.ई.एस स्कूल मुंबई (व्दितीय विजेती) जिया कुंभार- आश्विनी इंटरनॅशनल स्कूल मुंबई ( तुतीय विजेती) विजेता ९ वी अनमोल नौटीयाल- विद्याव्हॅली स्कूल पुणे (प्रथम विजेती) वरद होंडे- ज्ञानेश्वर बालाजी मुरकुटे शाळा, पुणे (व्दितीय विजेती) निलेश साहू – बी.पी.ई.एस स्कूल मुंबई (तुतीय विजेती)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading