fbpx
Saturday, April 27, 2024
PUNE

आज पुणेकरांचे कोठ्यावधी रुपये पाण्यात…

पुण्यातील वाहतुकीला दिलासा देण्यासाठी आणि चौकातील वाहतूक कमी करण्यासाठी उड्डाणपुलांचा जन्म झाला. मात्र नेते आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे चित्रविचित्र उड्डाणपूल बांधण्यात आले. त्यामुळे वाहतुकीवर आळा बसला नाही, उलट अपघात होऊन लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. कारभारी बदलले की निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की पुणेकरांच्या खिशाला कात्री लागते हा उड्डाणपूल व इतर कामातील विकासकामांचा इतिहास आहे. सगळं मर्जीतल्या लोकांकडून होतं.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल आज पासून पाडणार आहेत. कोट्यवधी रुपये आज पाण्यात जाणार. पूर्वी रस्ते खड्डेमय झालेले असताना आता मेट्रोसाठी उड्डाणपूल पाडणारे हुशार सत्ताधीश काही कामाचे नाहीत. उड्डाणपूल बांधण्यात नंतर चुकीचे उड्डाणपूल बांधले म्हणून सुरुवातीपासूनच उड्डाणपुलाला विरोध होता. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी हा उड्डाणपूल असतानाचा सुद्धा संघर्ष आहे. *जर उड्डाणपुलाचे काम चुकले असेल तर तत्कालीन अधिकारी व नेते यांच्यावर खटले दाखल करून यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजेत.* कारण गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे पुढच्या खुर्च्या सुध्दा कुरतडून खात आहेत. नवीनच बनवलेल्या उड्डाणपुलाची अजून ‘हळद’ सुद्धा निघालेली नाही. हे मनपा प्रशासन व टक्केवारी दडलेल्या कारभाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

पुणेकरांच्या टॅक्स रुपी पैशातून नगरसेवक व कारभाऱ्यांच्या हितासाठी सहा महिन्यात दोनदा कामे केली जातात आणि पैसा खर्च होतो. हे पैसे खाण्याचं शासकीय कुरण झालेला आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल चुकीचा बनवला गेला होता तर त्याला मान्यता कशी देण्यात आली…? हे निष्क्रिय आणि अशिक्षित कारभारी आणि प्रशासन यांना लक्षात कसे आले नव्हते. चांगले रस्ते, नियोजित वाहतूक आणि उत्तम फुटपाथ ही शहराची शान आहे. मात्र रस्ते लहान आणि फूटपाथ मोठे करणारे हेच मनपा प्रशासन आणि नगरसेवक सोयीने निर्णय घेत आलेले आहेत. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत असताना नगरसेवकांच्या हितासाठी मोठे फूटपाथ कशासाठी हा सुद्धा प्रश्न आहे. भविष्यात वाहतूक कोंडी लक्षात घेता कोट्यावधी रुपये खर्च केलेले फुटपाथ सुद्धा काढून टाकले जातील हे आम्हाला मान्य नाही. उड्डाणपूल पाडणाऱ्या पुणे मनपा प्रशासनाचा ‘संभाजी ब्रिगेड’ च्या वतीने जाहीर निषेध…

कात्रज चौकाला उड्डाणपुलाची गरज असताना तिथे उड्डाणपूल होत नाही आणि जिथे उड्डाणपूल आहे तिथे कारण सांगून पाडले जातात. स्मार्ट सिटी च्या गप्पा मारणारे आज पुणे 100% रोड झोन मध्ये असताना आरोग्य यंत्रणा कुचकामी असताना सरकार मात्र पुणेकरांच्या हातावर तुरी देण्याचे काम करत आहे.

लाॕकडाऊन मध्ये विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल मेट्रोसाठी विद्यापीठ चौकातील पुलासह गणेशखिंड रस्त्यावरील आणखी दोन पूल पाडण्याची शिफारस केली असेल तर ते दुर्दैवी आहे. आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन व विरोध केला तर आम्हाला शासकीय कामात अडथळा आल्यामुळे गुन्हे दाखल करतील. मात्र यांनी जर कोट्यावधी रुपये जनतेचे नुकसान केले तर यांना तुरुंगात टाकलं पाहिजे हीच सामान्य जनता म्हणून आमची इच्छा आहे.

पुणेकरांनो… चौकाचौकात नगरसेवक आणि आजी-माजी सभागृह नेत्यांनी लावलेले लाइटिंग’चे बोर्ड सुद्धा 100% अनधिकृत आहेत. लाइटिंग च्या बोर्डाला लावलेली लाईट सुद्धा अनाधिकृतपणे रस्त्यावरील स्टेट लाईटला आकडा टाकून कनेक्शन घेतले आहे. मनपाचा विद्युत विभाग सुद्धा ते कनेक्शन काढत नाही किंवा बेकायदेशीरपणे घेतलेल्या कनेक्शन वर कारवाई करत नाही. सगळी कामं अनाधिकृतपणे सुरू आहेत. सगळं निषेधार्ह…

आम्ही टॅक्स भरतो, आम्ही बोलणारच…!

– संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड, पुणे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading