रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा स्थापना दिन साजरा

पुणे, दि. १३ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा पंधरावा स्थापना दिन १३ जुलै रोजी साजरा करण्यात आला.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार,इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य डॉ.अनिता फ्रान्झ उपस्थित होत्या.आझम कॅम्पस येथे हा कार्यक्रम झाला.प्राध्यापक,सेवक वर्ग उपस्थित होता. हॉस्पिटॅलिटी,हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात इन्स्टिट्यूट आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
