Saturday, June 20, 2026
NATIONAL

उत्तर प्रदेशचा कुख्यात गुंड विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

कानपूर, दि. 10 – कुख्यात गुंड विकास दुबे कानपूर पोलिसांकडून एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याची ताजी माहिती समोर येत आहे. काल विकास दुबेला अटक करण्यात आली होती. आज सकाळी उत्तर प्रदेशची स्पेशल फोर्स टीम त्यांना मध्य प्रदेशच्या उजैवमधून कानपूर येथे आणत असताना गाडीचा अपघात झाला. या दरम्यान, विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि दुबेमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. त्यात तो मारला गेल्याची माहिती सांगितली जात आहे.

काय आहे घटनाक्रम

कुख्यात गुंड विकास दुबे याला काल कानपूर पोलिसांनी अटक केली होती. आज पहाटे त्याला मध्य प्रदेशमधील उजैन येथून कानपूर आणले जात होते. यावेळी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची विकास दुबेला आणत होती. दरम्यान, भौती गावात पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. गाडी पलटली. या प्रसंगाचा फायदा घेत विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांचीच बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनीही त्याला थांबवण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र तो गोळ्या झाडत राहिला. या चकमकीत पोलिसांकडून विकास दुबे मारला गेला. विकास दुबेच्या छातीवर गोळ्या लागल्या. तर पोलिसांचेही दोन जवान जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत कानपूरच्या हॅलेट रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोस्ट वॉन्डेट गुंड विकास दुबे

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये पोलीस पथकावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात उपअधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यास गेले असता ही चकमक उडाली होती. तेव्हापासूनच पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचे बक्षिसही जाहीर केले होते. अखेर काल मध्य प्रदेशच्या उजैनमधील एका मंदिरातून त्याला अटक करण्यात आली होती. गोळीबारात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांकडून विकासला ठार मारण्याची मागणी होत होती. त्याला ताब्यात घेऊन वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्या कुटुंबियांकडून प्रतिक्रिया येत होती. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी त्याचा राईट हँड समजला जाणारा अमर दुबे याचाही एन्काउंटर कानपूर पोलिसांनी केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading