Saturday, June 20, 2026
PUNE

पुणे विभागातील 22 हजार 48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे दि. 7 :- पुणे विभागातील 22 हजार 48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 36 हजार 671 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 13 हजार 342 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 281 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 702 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.12 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयात 30 हजार 425 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 18 हजार 395 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 135 आहे. कोरोनाबाधित एकूण 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 494 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.46 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.94 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 262 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 22, सातारा जिल्ह्यात 38, सोलापूर जिल्ह्यात 160, सांगली जिल्ह्यात 25 तर कोल्हापूर जिल्ह्यात 17 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयात कोरोना बाधीत 1 हजार 372 रुग्ण असून 813 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 504 आहे. कोरोनाबाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयात 3 हजार 371 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 825 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 242 आहे. कोरोना बाधित एकूण 304 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयात कोरोना बाधीत 520 रुग्ण असून 270 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 237 आहे. कोरोना बाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयात 983 कोरोना बाधीत रुग्ण असून 745 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 224 आहे. कोरोना बाधित एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 11 हजार 356 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 6 हजार 681 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 675 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 69 हजार 642 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 36 हजार 671 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 7 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading