Saturday, June 20, 2026
PUNE

गझलचे जाणकार संगीतकार, गायक रवी दाते यांचे निधन

पुणे, दि. ७ – सुरावटींचा साज चढवून मराठी गझलविश्व फुलविणारे ज्येष्ठ संगीतकार ,गायक आणि तबलावादक रवी दाते (वय ८१) यांचे आज सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा समीर आणि मुलगी अश्विनी असा परिवार आहे.

दिवंगत भावगीत गायक अरुण दाते यांचे ते कनिष्ठ बंधू होते. रवी दाते यांनी भावगीताबरोबर गझल हाही प्रकार निवडला होता. त्यांनी सुरेश भट यांच्यासह अनेक गझलकारांच्या रचनांना संगीताचा साज चढविला होता. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गझल अनेक कलाकारांनी गायलेल्या आहेत.

समजुनी व्यथेला समजावता न आले… चंद्र आता मावळाया लागला… दुभंगून जाता जाता यांसारख्या त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गझला रसिकांच्या आजही ओठावर आहेत. सुरेश भट यांच्या गझलांना संगीत दिलेली रंग मैफलीचा ही ध्वनिफित त्यावेळी गाजली होती. यातील गझलांचे गायन सुरेश वाडकर यांनी केले होते. मराठी माणसाच्या भावविश्वात अजरामर असलेला शुक्रतारा या भावगीतांच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी गायक अरुण दाते यांना तबल्यावर साथसंगतही केली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading