fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENT

‘भाखरवडी’मध्‍ये नवीन चेहरे नितीन भाटिया व देवांशी सोमय्या

सोनी सब आपल्या प्रेक्षकांना खुशियोंवाला झोनमध्‍ये घेऊन जाणार आहे, जेथे चॅनेल सर्वांचे लाडके गोखले व ठक्‍कर कुटुंबांना पुन्‍हा घेऊन येण्‍यास सज्‍ज आहे. भाखरवडी ही हलकी-फुलकी कौटुंबिक मनोरंजनपूर्ण मालिका नवीन एपिसोड्ससह परतणार आहे, तसेच मालिका काळझेप घेत असल्‍यामुळे प्रेक्षकांना काही वर्षे पुढे घेऊन जाणार आहे.

गोखले व ठक्‍कर कुटुंबांमधील प्रवासाला नाट्यमय वळण मिळणार आहे. आगामी काळझेपसह नवीन एपिसोड्समध्‍ये गायत्री व अभिषेकचा मुलगा कृष्‍णा पाहायला मिळणार आहे. बालकलाकार हरमिंदर सिंगने ही भूमिका साकारली आहे. हरमिंदरसोबत कलाकारांमध्‍ये उज्‍ज्‍वलाच्‍या भूमिकेत देवांशी सोमय्या,मंदारच्‍या भूमिकेत नितीन भाटिया यांचा समावेश होणार आहे, तसेच प्रशांत सवालिया उर्मिलाचा भाचा चिरागच्या भूमिकेत दिसणार आहे.

नवीन एपिसोड्समध्‍ये पात्रांमधील नवीन डायनॅमिक्‍स पाहायला मिळतील, जेथे ठक्‍कर व गोखले कुटुंबांमधील गमतीजमती प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करतील.

मंदारची भूमिका साकारताना दिसणारा नितीन भाटियाला मालिकेचा भाग असण्‍याचा खूप आनंद झाला आहे. तो म्‍हणाला,”मी मालिका भाखरवडीच्‍या माध्‍यमातून पुन्‍हा एकदा सोनी सबचा भाग होण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. मी गतकाळात हॅट्सऑफ प्रॉडक्‍शनसोबत विविध प्रकल्‍पांचा भाग राहिलो आहे आणि मला पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍यासोबत काम करण्‍याचा आनंद होत आहे. मी माझ्या मंदार भूमिकेचा आनंद घेत आहे. मंदार हा अण्‍णाच्‍या खूप जवळ असल्‍यामुळे देवेन सरांसोबत माझे सुरूवातीचे सीन्‍स शूटिंग करण्‍यात आले आहेत. हा अत्‍यंत अद्भुत अनुभव राहिला आहे. संपूर्ण टीममधील वातावरण इतके शांत व खेळीमेळीचे आहे की, मला येथे मी नवीन असल्‍यासारखे वाटलेच नाही. सध्‍याच्‍या अनिश्चित काळामध्‍ये आम्‍ही शूटिंग करत असल्‍यामुळे प्रत्‍येकाच्‍या सुरक्षिततेसाठी टीमने खबरदारीचे उपाय घेतले आहेत. मी या नवीन प्रवासासाठी खूप उत्‍सुक आहे. सोनी सब पाहत राहा, आम्‍ही लवकरच परत येत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading