पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह
पुणे, दि. 4 – पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाली आहे. स्वतः महापौर यांनी ट्विटर वर या बाबत माहिती दिली आहे. ताप येऊ लागल्याने महापौरांनी करोना चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आपली प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी कळविले आहे.
ट्विटरवर याबाबत माहिती देताना पुढे त्यांनी म्हटले आहे की, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.