fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

कोरोना – आज उच्चांकी ७ हजार ७४ नवीन रुग्ण, तर तब्बल २९५ मृत्यू

महाराष्ट्राने ओलांडला २ लाख रुग्णसंख्येचा टप्पा

पुण्यात ८१९ नवीन कोरोनाबधित
मुंबई, दि. ४ – राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ०७४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २९५ जणांना मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाबा म्हणजे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांच्या वर गेला असून आतापर्यंत ८ हजार ६७१ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात शनिवारी नोंदविलेल्या २९५ मृत्यूंपैकी १२४ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि उर्वरित १७१ पूर्वीच्या कालावधीतील मृत्यूंपैकी १६३ मृत्यू हे ठाणे जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील रिकॉन्सिलेशनद्वारे नोंदविण्यात आले आहे. या १७१ मृत्यूंमध्ये ठाणे मनपामधील ७०, ठाणे १५, नवी मुंबई ३३, कल्याण डोंबिवली ३२, उल्हास नगर ८, भिवंडी ५, मीरा भाईंदर २, पिंपरी चिंचवड २, सोलापूर ३ आणि लातूर १ यांचा समावेश आहे. शनिवारी ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत १,०८,०८२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,८०,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,००,०६४ (१८.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,०३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४१,५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

#Pune#PMC#Corona#Update

४ जुलै
– दिवसभरात ८१९ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ३९९ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात १८ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.

– ३८५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २०६६८.

(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-१९७६६ आणि ससून ९०२)

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७२७६.
– एकूण मृत्यू -७०३.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १२६८९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब)

तपासणी- ३७५७.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading